जगदगुरू पलसिध्द महास्वामी पिठाच्या विकासाला चालना देण्यासाठी पाठपुरावा करणार : माजी मंत्री बच्चू कड

Khozmaster
2 Min Read

साखरखेर्डा:-तालुका प्रतिनिधी 

श्रीमद‌लगतूरु पलसिध्द मठ आपल्या पौराणिक खाणाखुणा जोपासत भारतभर धर्म जागरणासाठी शिवाचार्य महाराज, सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज भ्रमन करीत आहेत. वीरशैव सांप्रदायचहू‌बाजूंनी विखुरल्याने भगवान शिवाचा अखंड जागर आणि त्यामाध्यमातून धर्म जागृतीसाठी न निवता धर्माची खरी ओळख सर्वांना होत आहे.
मठात वाहणारा भाविक वर्ग लक्षात घेता मठाच्या विकासाला चालना मिळण्यासाठी आपण शासन दरबारी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिले.बच्चू कडू शिवणी अरमाळ येथून २६ मार्च रोजी बेट साखरखेडांत दाखल झाले. यावेळी मठाचे कार्यवाहक तथा विश्वस्त विश्वनाथ आप्पा जितकर, पत्रकार संतोष गाडेकर यांनी जगदूरू पलसिध्द महा स्वामींच्या मठाचा ऐतिहासिक वारसा आणि कार्याबद्दल त्यांना माहिती दिली. त्यावर बच्चू कडू यांनी मठ आणि साखरखेर्डा येचील समस्यांच्या मागणीचा प्रस्ताव तयार करून दिल्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी त्याांनी शिक्षक के. पुरुषोत्तम मानतकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.यावेळी चंद्रशेखर शुक्ला, सुधीर बेंदाडे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष आदित्या तिवारी, विक्री जगताप, मंगेश लंबे, अमोल तुपकर, मनोज ठाकूर, शंकर इजाळे, ऋतिक वैराळ, प्रतिक तायडे, बाबू ठाकूर, अक्षय तांगडे, चेतन ठाकूर, हरिश्चंद्र जैस्वाल, विनोद देशमुख उपस्थित होते. दरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी सिंदखेडराजा मतदारसंघांत ग्रहारच्या शाखा स्थापन करून येणाऱ्या साखरखेड़ों ग्राम पंचायत निवडणुकीत पॅनल टाकण्यासाठी युवकांच्या पाठिशी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बच्चू कडू यांनी मठाच्या परिसराची पाहनी केली.

0 9 5 4 8 0
Users Today : 206
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *