बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादनपर कार्यक्रम संपन्न झाला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शिवभक्तांनी महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देत, त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून देण्यात आले. शिवभक्तांच्या जाज्वल्य उत्साहात संपूर्ण बाताबरण हर हर महादेव! आणि जर भवानी, जय शिवाजी च्या जयघोषान दुमदुमले.१४ मे २०२५ रोजी होणाऱ्या भव्य जयंती उत्सवासाठी आमदार भी संजयभाऊ गायकवाड यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड! यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, मा. नगराध्यक्षा सौ. पुजाताई संजय गायकवाड तसेच असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 206