मलकापूर:-तालुका प्रतिनिधी
येथील पद्मश्री डॉ. वि.भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ५ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तांत्रिक नवकल्पनांना चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता, संशोधनवृत्ती व अभियांत्रिकी कौशल्य सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केली जात आहे.या स्पर्धेत देशभरातील पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार असून, विजेत्यांना रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी १०,०००/-रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७,०००/- रुपये, हातीय क्रमांकासाठी ५,०००/- रुपये, तसेच दोन सांतन बक्षिसे प्रत्योकी १,०००/-रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रत्येोक गटात कमाल चार सदस्य सहभागी होऊ शकतात व प्रवेश नोंदणी शुल्क २०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आपले नावीन्यपूर्ण संशोधन सादर करण्याची संधी मिळणार असून, त्यांना उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील मिळेल, ही स्पर्धा कार्यक्रम संयोजक प्रा. डी. पी. खरात (अभियांत्रिकी) मो. ८६०५५३०४७९ आणि प्रा. डी. आर. जोशी (पॉलिटेक्निक) मो. ९५६१३५७१८१ मार्गदर्शनाखाली आयोजित केली जात आहे. तसेच आयक्यूएसी विभाग प्रमुख प्रा. आर. एम. चौधरी, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. एस. एन. खाचणे, प्रशासकिय डीन डॉ. युगेश खर्चे आणि प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी २ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी (बी.ई.) विद्यार्थ्यांसाठी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी लिंकवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना या स्पर्धेद्वारे नवीन तांत्रिक संकल्पना मांडण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, उद्योग तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याचीही संधी मिळणार आहे. स्पर्धे तील सहभागी गटांना रेल्वे भाड्यात सवलत मिळण्याची शक्यता आहे.
Users Today : 206