बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा शहरातील भीलवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती बुलढाणा एलसीबीला मिळाली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांनी पथक स्थापन करून आज 29 मार्चला सकाळी 6 ते 9 वाजेच्या सुमारास भीलवाडा परिसरात ठिकाणी हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून 5 आरोपी विरुद्ध कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 352 लिटर हातभट्टी दारू तसेच 2 हजार 615 लिटर 5 मोहा, सडवा सर्व असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी सुशीलाबाई बाबुलाल गायकवाड वय 51 वर्ष रा भिलवाडा, राधाबाई एकनाथ बरडे वय 47 वर्ष रा भिलवाडा, रेखा दीपक गायकवाड वय 39 वर्ष रा. भिलवाडा, वसंत आनंदराव जाधव वय 50 वर्ष रा आंबेडकर नगर, चंदाबाई बबन माळे वय 71 वर्ष रा भिलवाडा, बुलढाणा यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Users Today : 206