बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
पवित्र रमजान हिन्याला 2 मार्चपासून सुरुवात झाली आहे. मुस्लीम बांधवांसाठी रमजान महिना सर्वांत पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लीम बांधव दिवसभर कडक रोजा अर्थात उपवास ठेवतात. त्यानिमित बाजारपेठेत फळे, सुकामेवा यांसह विविध साहित्य तसेच खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. रमजान ईद 31 मार्च किंवा । एप्रिल रोजी असल्याने बाजारपेठ रमजान ईद निमित्त सजली आहे. मुस्लीम समाज बांधव फळे, खजूर, कपडे व शिरखुरमा करिता मेवा खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना दिसून येत आहेत. इस्लाम धर्मात सर्वात पवित्र महिना मानला जाणाऱ्या रमजान महिन्यात ईश्वरसेवा केली जाते. दररोज पाच वेळा नमाज कुराण पठण केले जाते. रमजानचे रोजे सुरू होताच होताच विविध फळे, सुकामेवा आदी पदार्थांची मागणी वाढते. यात प्रामुख्याने खजुरालाही पसंती आहे. खजूर विविध औषधी गुणधर्मामुळे आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते. त्याला स्वर्गातील फळ म्हणून मुस्लिम बांधव संबोधतात. मुस्लिम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांनी रमजान महिन्यात इफ्तारच्या वेळी खजूर खाऊन रोजा सोडल्याचा धार्मिक संदर्भ आहे. त्यामुळे रमजान महिन्यात रोजा, उपवासासाठी दररोज खजूर आणि खारीक यांना पसंती दिली जाते, असे सांगितले जाते. या काळात विविध प्रकारचे खजूर आकर्षण ठरतात. यंदाही बाजारपेठेत त्यांची विविधता दिसून येते. गुणवत्ता व आकारानुसार याचे दर आहेत. अन्य सुक्यामेव्याच्या तुलनेत ते स्वस्त असल्याने सर्वच स्तरांतून अधिक मागणी असल्याचे बोलेले जता आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात टोप्या, हातरुमाल, लुंगी, सुकामेवासहित विविध खाद्यपदर्थांचे साहित्य, विविध प्रकारचे सुगंधी अत्तर, आणि लहान मुलांची खेळणी आदी वस्तुंची दुकाने थाटण्यात आली आहेत. वाढत्या महागाईसोबत या वस्तुंच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. बाजारपेठेत सध्या रसदार फळांची आवक वाढली आहे. विविध प्रकारची रसदार फळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फळ बाजारात टरबूज, द्राक्ष, अननस, पपई, खरबूज, संत्रे, केळी, सफरचंद, चिकू इत्यादी फळांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.
Users Today : 206