बीजेएसने निर्माण केलेली पाणपोई एसटी महामंडळाने केली उध्वस्त

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी 

विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर बसलेल्या श्री बालाजी महाराजांची पुण्यनगरी म्हणून सर्व दूर ओळख निर्माण करणाऱ्या देऊळगाव राजा शहरातील महामंडळाच्या बस स्थानकावर २२ वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सेवेसाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेऊन लाखो रुपये खर्च करून थंड पिण्याच्या पाण्याची पानपोईचे निर्माण केले पानपोईचे निर्माण झाल्यापासून लाखो प्रवाशांनी याचा लाभ घेतला तर गरज नसताना महामंडळाचे बतीने जुने बस स्थानक पाहून नवीन बस स्थानक बांधकामाचे निविदा प्रक्रिया पूर्ण केली व बांधकामास पाच वर्षांपूर्वी सुरुवात केली सदर बांधकाम होत असताना या पाणपोईमुळे कोणतीही अडचण निर्माण झालेली नसताना व कंत्राट दाराच्या इशाप्यावरून ‘वा ने निर्माण केलेली पाणपोई उध्वस्त करून टाकली त्यामुळे या गजबजलेल्या बस स्थानकावर प्रवाशांना पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत बीजेएसच्या वतीने पाणपोई उद्भवस्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशीची व कार्यबाहीची मागणी करण्यात आलेली आहे. देऊळगाव राजा शहराला पंचक्रोशीतील जवळपास ५० खेडी जोडलेली आहे व हे शहर राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने या ठिकाणच्या बस स्थानकावरून २४ तास महामंडळाच्या बसेस चा जाण्या येण्याचा प्रवास सुरू असतो त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ या ठिकाणी असते संपूर्ण देशात दान देण्यामध्ये पाणपोईचे निर्माण करण्यामध्ये गौशाळेचे निर्माण करण्यामध्ये अपंग व मूकबधिर विद्यालयाचे निर्माण करण्यामध्ये जैन समाज फार अग्रेसर आहे शहरातील बस स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला व २२ वर्षापूर्वी लोक वर्गणी जमा करून चॅनाईट व मार्बलचा उपयोग करून बंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रवाशांसाठी करून दिली त्यानंतर जे जुने बस स्थानक होते अगदी सुव्यवस्थित स्थितीत असताना केवळ आर्थिक लाभासाठी महामंडळाने या ठिकाणी जुने बस स्थानक पाहून नवीन बस स्थानक बांधण्याचे कामास मान्यता मिळवून घेतली व नवीन बस स्थानकाचे काम पूर्ण केले हे होत असताना बीजेएसने निर्माण केलेल्या पाणपोई ची कोणतीही अड्चण होत नसताना केवळ बीजेएस हे नाव खटकत असल्यामुळे संबंधित कंत्राटदार व अभियंता यांनी पाणपोई उध्वस्त करून टाकली तेव्हापासून या बस स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे लोक सहभागातून निर्माण करण्यात आलेली पाणपोई उध्वस्त केल्याप्रकरणी भारतीय जैन संघटनेने महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करून चौकशी व कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

0 9 5 4 8 0
Users Today : 206
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *