देऊळगाव राजा परिसरातील पोलिस कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

Khozmaster
1 Min Read
देऊळगाव राजा :- तालुका प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यात पोलिसाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना  उघड झाली आहे. जालना पोलिस दलातील ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (वय ३८, गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या एमएच २० डीव्ही ३०६३ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये आढळून आला. सदर घटना आज ३० मार्च रोजी देऊळगाव राजा- सिंदखेडराजा रोडवरील आरजे इंटरनॅशनल स्कूलसमोरच्या वन विभागाच्या जागेत उघडकीस आली.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, म्हस्के यांचा मृतदेह गाडीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गाडी आतून लॉक होती, त्यामुळे हा घातपात की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. गळा आवळून केल्यासारख्या खुणा आढळून आल्याने खून असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.  याच महिन्यात २३ मार्चला अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत भागवत गिरी या पोलिसाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एका पोलिसाचा मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय अधिकारी मनिषा कदम, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक बि. बि. महामुनी यांनी बारकाईने पाहणी केली.  श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
0 9 5 4 8 0
Users Today : 206
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *