नांदुरा:-तालुका प्रतिनिधी
घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर म्हणजे कमीत कमी कालावधीत सर्व संस्कार विधी आटोपले जातात. मात्र, शोषित, पीडित व अन्यायग्रस्ताला निस्वार्थपणे न्याय देण्याचे कार्य प्रा. अॅड व्ही. के. क्षीरसागर यांनी केले म्हणून सलग पंधरा वर्षानंतरही त्यांचा स्मृतिदिन साजरा होणे, यातच त्यांनी केलेल्या कार्याची महानता दिसून येते, असे स्पष्ट प्रतिपादन माजी मुख्याध्यापक एच.एन. मोरे यांनी केले.स्थानिक पंचशील सार्वजनिक बौद्ध विकास मंडळ बुलढाणा वतीने आयोजित प्रा. अॅड. व्ही. के. क्षीरसागर यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. वार्ड क्रमांक २ येथील बुद्ध विहारात २९ मार्चला आयोजित या कार्यक्रमात के.ओ. बावस्कार, पी. आर. इंगळे, जे.पी. वाकोडे, पत्रकार तुकाराम रोकडे आणी अस्मिता क्षीरसागर यांनीही शब्द सुमनांनी आपली आदरांजली वाहिली. अस्मिता क्षीरसागर यांनी प्रा. अॅड. व्ही. के. क्षीरसागर यांच्या जिवन कार्यावर आधारित स्मृती गौरव ग्रंथा करिता ज्यांच्याकडे साहित्य, फोटो उपलब्ध असेल, त्यांना साहित्य, फोटो देण्याचे आवाहन केले. कार्याक्रमाचे प्रास्ताविक एन. आर. वानखडे व संचालन संजय इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन बी. के. इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघमित्रा क्षीरसागर, कमल लोखंडे, गौरव लांडगे, विशाखा इंगळे, प्रसेनजीत क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.
Users Today : 206