मलकापूर:-तालुका प्रतिनिधी
येथील गोविद विष्णू महाजन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे. एल. कुलकर्णी यांचा सेवापूर्ती सोहळा ३१ मार्च रोजी डॉ. बावासाहेव आंबेडकर कक्षामध्ये उत्साहात पार पडला.मागील ३२ वर्षांपासून मलकापूर शिक्षण समितीच्या अंतर्गत असलेल्या विविध विद्यालयांमध्ये सेवा देणारे जे. एल. कुळकर्णी यांनी हिराबाई संचेती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात इतिहास विषयाचे अध्यापन केलेले आहे. तर स्व. बबनराव देशपांडे कनिष्ठ महाविद्यालय येथे उपप्राचार्य म्हणून यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. तसेच मागील सहा महिन्यांपासून गोविंद विष्णू महाजन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य या पदावर ते कार्यरत होते. या संपूर्ण सेवेत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तथा कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 206