विवेकानंद आश्रमात आजपासून प्राणप्रतिष्ठा उत्सव शोभायात्रेने होणार प्रारंभ; ६ दिवस पंचकुंडी यज्ञाचे आयोजन

Khozmaster
2 Min Read

हिवरा आश्रम:-विशेष प्रतिनिधी 

विवेकानंद आश्रमात शुकदास महाराजांच्या समाधी स्मारक मंदिरात त्यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा उत्सवाला आजपासून सुरूवात झाली. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा आगळ्यावेगळया पध्दतीने होणार आहे.स्वामी विवेकानंदांच्या विचारांना जीवनध्येय बनवून आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी कर्मयोग अंगिकारला. २०१७मध्ये ते ब्रह्मलीन झाले. त्यांचा निरपेक्ष सेवाविचार पुढे नेण्याचे काम संस्थेत केल्या जात आहे. महाराजांचे समाधी स्मारक मंदिर असावे, अशी असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा लक्षात घेवून संस्थेने त्यांचे भव्य, रेखीव, नक्षीदार व शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले राजस्थानच्या अंबाजी मार्बल दगडात मंदिर निर्माण केले आहे. आजपासून ब्रह्मवृंदांच्या सहकार्याने २१ भाविकांच्या हस्ते पंचकुंडी यज्ञात यज्ञ केला जाणार आहे. महाराजांनी ज्ञान, विज्ञान आरोग्य, कृषी, साहित्य, कला, संशोधन इत्यादी क्षेत्रात मानवसेवेसाठी अफाट कार्य केले आहे. त्यामुळे विवेकानंद आश्रम या सेवेच्या माध्यमातून समाजातील सर्वदूर घटकापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे या विधीसाठी असंख्य भाविक आश्रमात दाखल होणार आहेत. या कार्यक्रमाची सुरूवात सकाळी ८ वाजता महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रेने होणार आहे. आश्रमातून सुरू होणारी ही शोभा यात्रा दिंड्या, लेझीमसह सवाद्य ग्रामप्रदिक्षणा करणार आहे. सुवासिनी प्रत्येक घरासमोर प्रतिमेचे वंदन व पूजन करणार आहे. आजच्या यज्ञात प्रायश्चित संकल्प, यजमानादी क्षौरकर्म, दशविधी स्नानं, स्नानागं तर्पण, भगवत चिंतन एवं, प्रायश्चित हवनं, पुरूष सुक्तेन न्यासम गोदान संकल्प, गोत्रवणम दानम प्रायश्चित होम हे विधी होतील. यासाठी यज्ञशाळा निर्माण केली असून पूर्णपणे नैसर्गिक साधन सामुग्रीने तयार केलेल्या या मंडपात सकाळी ९ ते १ दुपारी ३ ते ७ यावेळेत यज्ञ केल्या जाईल. या ५५ फुट उंच मंदिराची निर्मिती राजस्थान येथील प्रसिध्द शिल्पकाराने अंबाजी मार्बल या पांढऱ्या शुभ्र दगडात ५५ केली आहे. व्हिएतनाम मार्बल या दगडामध्ये महाराजांची मुर्ती तयार केली असून जिल्ह्यातील एक अप्रतिम कलाकृती म्हणून या स्मारक मंदिराकडे पाहिल्या जाते. या कार्यक्रमासाठी येणारे भाविक सायंकाळी ७ ते १० या वेळेत हभप रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेचा श्रवणानंद घेत आहेत. येणाऱ्या भाविकांची सर्व व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली असून भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

0 9 5 4 8 7
Users Today : 213
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *