शेंदुर्जन:-तालुका प्रतिनिधी
गणपती नेत्रालय जालना व शेंदुर्जन ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त ३० मार्च रोजी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सदर मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मा, औषधी यांचा रुग्णांना लाभ व्हावा, म्हणून दवंडीद्वारे तीन दिवसापासून रुग्णांना माहिती देण्यात आली होती. दरम्यान, नेत्र तपासणी शिबिराला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात करण्यात आली. नेत्र तपासणी करिता गणपती नेत्रालय जालना येथील डॉक्टरांची टीम वेळेवर हजर झाली होती. येणाऱ्या रुग्णांकरिता ग्रामपंचायतीने पाण्याची व्यवस्था व उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीची व्यवस्था करण्यात आली होती. मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ अंदाजे २२५ ते २५० रुग्णांनी घेतला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपसरपंच नकुल शिंगणे व विठ्ठल शिंगणे यांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत शेंदूरजनाच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरामुळे गोरगरीब रुग्णांना चांगला दिलासा मिळाला आहे.
Users Today : 213