पांदण रस्त्यांचा प्रश्न सुटणार तरी कधी? शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

Khozmaster
2 Min Read

तेल्हारा:-विशेष प्रतिनिधी

म्हणायला शासन तुमच्या दारी… पण शेतकरी शेतमाल कसा आणेल घरी? असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी पांदण रस्त्यांची भीषण समस्या मांडून शासनाकडे त्याचे लक्ष वेधले. तालुक्यातील मोजके अपवाद वगळता कोणतेही पांदण रस्ते, जुने शिव दांड व गाळरस्ते सुस्थितीत नसून सर्व रस्ते मोडलेल्या अवस्थेत आहेत.त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या शेतातील माल व्यवस्थीत आणता येत नाही. तो माल कसरत करून शेतातुन आणावा लागतो. त्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. म्हणुन महाराष्ट्र सरकारने शेती रस्ते विधेयक पारित करावे. शेतकऱ्याला कमीत कमी खडीकरनाचे शेती रस्ते करून दयावेत. मोठया शेतकरी हा लहान शेतकऱ्याला सरकारी शेती रस्ता असल्या नंतरही जावु देत नाही.असे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याकरीता रस्ते विधेयक आणणे योग्य आहे. शेतकऱ्यांमध्ये रस्ता विषयक वेगवेगळे भांडणे, तट्टे होतात व अशी बरेच शेत रस्त्याचे भांडणे कोर्टात प्रलंबीत पडलेले आहेत. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांना यांची झळ पोहचत आहे. जर महाराष्ट्र सरकारने शेती रस्ते दुरूस्ती विधेयक पास केले तर हजारो शेतकऱ्यांची होण्याऱ्या हालापासुन व नुकसानापासुन मुक्तता होईल. व उत्पन्नामध्ये वाढ होवुन आपल्या राज्यातील बळीराजा सुखी होईल. असे मनोगत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. हिवरखेड येथील शेतकऱ्यानी रस्त्या करीता उपोषन सुध्दा केले होते. तत्कालीन खासदार संजय धोत्रे अकोला व जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे २००५ ते २०१० या कालावधीमध्ये कित्येक वेळ निवेदने केली पण काहीही साध्य झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.एकीकडे आपली सामाजिक बांधिलकी ओळखून मुंजा वाट आणि तळेगाव बेलखेड आणि इतर काही पांदन रस्त्यांची दुरावस्था पाहून हिवरखेड चे भूमिपुत्र, लोकजागर मंच चे संस्थापक अनिलभाऊ गावंडे यांनी पुढाकार घेवुन स्वखचार्तुन आणि लोकसहभागातून त्या रस्त्याचे रूंदीकरण खडीकरण करून त्या शेतकऱ्यांना रस्ता करून न्याय मिळवुन दिला आहे. परंतु दुसरीकडे निष्क्रिय लोकप्रतिनिधींच्या आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे हिवरखेड- सौंदळा, हिवरखेड- उमरशेवडी, हिवरखेड-हिंगणी, हिवरखेड खंडाळा, हिवरखेड अडगाव, हिवरखेड-तळेगाव, झरी-कारला,कारला-उमर शेवडी, हिवरखेड-जुना मालठाणा, झरी-हिवरखेड शिवदांड तसेच तालुक्यातील अनेक शिवदांड व असे अनेक पांदन रस्ते लुप्त प्राय झाले असून ते रस्ते मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

0 9 5 4 8 7
Users Today : 213
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *