कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘आयपीआर’ विषयावर कार्यशाळा

Khozmaster
1 Min Read

संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी 

कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे संशोधनासंबंधीचा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आयपीआर अर्थात इंटेलेक्न युअल प्रॉपर्टी राइट्स या विषयावर एकदिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा २६ मार्च २०२५ रोजी उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती मेहरबानू कला व वाणिज्य महाविद्यालय अकोला येथील प्राचार्य डॉ. स्मिता सिंग्ग्रुप व जी एस महाविद्यालय खामगाव येथील डॉ. पी पी ठाकूर हे लाभले होते. या कार्यशाळेला महाविद्यालयातील आयक्युऐसी समन्वयक डॉ. संजय टाले, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सतीश राणे, ग्रंथपाल सुनील माकोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविक समन्वयक डॉ. संजय टाले यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सदर एक दिवसीय कार्यशाळा महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, ग्रंथालय विभाग व आयक्युऐसी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. संचालन प्रा. नागेश इंगळे व आभार प्रदर्शन डॉ. सुरेश भालतडक यांनी केले केले. या कार्यशाळेला संशोधक, प्राध्यापक वृंद, महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवीचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

0 9 5 4 8 7
Users Today : 213
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *