निराधार लाभार्थ्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढा अनिल जाधव यांची मागणी

Khozmaster
1 Min Read

मालेगाव:-तालुका प्रतिनिधी 

तहसील कार्यालयात विविध लाभासाठी सादर केलेले प्रकरणे ३१ मार्च पूर्वी निकाली काढावे, तसेच विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी कराव्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल गंगाराम जाधव यांनी केली आहे.तहसील अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार विभागा मार्फत विविध योजने करिता तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी सह श्रावण बाळ योजना, विधवा महिला, परित्यक्ता महिला या सह इतर लाभार्थ्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाकरिता ऑनलाईन अर्ज, फाईल तयार करून दिली असून त्यांच्या फाईल, प्रकरणे निकाली काढण्यात आले नाहीत. ग्रामीण भागातील पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी मागील काही महिन्यांपासून शासनाच्या योजनेचे अनुदान मिळावे, या उद्देशाने सेतु केंद्रात लागणारी कागदपत्रे तयार करून अर्ज ऑनलाईन करून फाईल तयार केली आहे. मार्च अखेरपर्यंत त्यांच्या फाईल सेतु मधुन मागवून घेऊन संबधित अधिकारी व तहसीलदार यांनी मंजूर करून घ्यावी, मार्च नंतर महसूल वर्ष नवीन लागते कारण या लाभार्थीना अनुदानासाठी ३१ मार्च आधीचे उत्पन्न दाखले लावली असून त्यांना परत नव्याने नवीन वर्षाचे उत्पन्न दाखला लावण्याची गरज राहणार नाही, मागील सभेमध्ये जवळ पास ४०० च्या वर प्रकरणे नामंजूर करण्यात आली असून ती प्रकरणे व नवीन प्रकरणे मंजूर करुण लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अनिल जाधव यांनी केली आहे. तसेच पालकमंत्री भरणे यांनी तहसिल अंतर्गत विभागातील विविध अशासकीय समित्या, जिल्हाच्या समित्या स्थापन कराव्या, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

0 9 5 4 8 7
Users Today : 213
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *