मेहकर :- शहर प्रतिनिधी
सहकार क्षेत्रात पारदर्शकता महत्वाची आहे . छत्रपती अर्बन बँकेला अध्यक्ष म्हणून लाभलेले दिलीप वाघ राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेलं पदार्पण नक्कीच भविष्यात प्रभावी ठरणार. सर्व संचालक मंडळाच्या समन्वयाने आगामी काळात ही पतसंस्था उच्चांक गाठणार तसेच छत्रपती अर्बन बँकेला पुढील काळात सहकार्य असेल अशी ग्वाही यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव यांनी कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, या संस्थेच्या संचालक मंडळाला पुर्वानुभव आहे यामुळे अर्थिक निकषांवर काम करणे सहज होईल तथा जनसामान्यांना व्यवहार सोईस्कर होईल.यावेळी कार्यक्रमपीठावर म प्र काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर,युवासेनेचे नेते तथा महाराष्ट्र अर्बन चे अध्यक्ष ऋषी जाधव, नानासाहेब काटे, संस्थापक अध्यक्ष दिलीप वाघ,शिवसेना तालुका प्रमुख निंबाजी पांडव, प्रा डॉ सचिन जाधव,प्रा आशिष रहाटे,शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे,राष्ट्रवादीचे गिरीधर ठाकरे,दत्ता घनवट, वैभव अर्बन चे अध्यक्ष विलासराव काळे,ऍड आकाश घोडे, तनशिराम मानघाले,एसडीओ रवींद्र जोगी, लोणारचे तहसीलदार भूषण पाटील,नायब तहसीलदार अजय पिंपरकर,गजानन धोंडगे,भाजपा तालुकाध्यक्ष सारंग माळेकर आदी हजर होते.
यावेळी मप्रकॉ चे सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी पतसंस्थेचे कामकाज,त्यातील धोके,घ्यावयाची काळजी,याबाबत सखोल मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, ह्या पतसंस्थेचे मार्गदर्शक विजेंद्र धोंडगे आहेत.त्यांचे सहकार व संघटन व प्रशासन या तिन्ही क्षेत्रातील त्यांचा अनुभव दांडगा असल्याने छत्रपती अर्बन अल्पावधीत वटवृक्ष बनेल असे सांगितले. तर युवासेनेचे नेते ऋषी जाधव म्हनाले की, पतसंस्था चालविणे जिकरीचे काम आहे.दिलीप सेठ वाघ आणि विजेंद्र धोंडगे यांच्या छत्रछायेत ही पतसंस्था मोठ्या ताकदीने मार्गक्रमण करेल.पतसंस्थेचे नाव देखील छत्रपती ठेवल्याने ह्या नावाची गरिमा व त्यामुळे लोकांचा असलेला सकारात्मक दृष्टीकोन ह्या पातसंस्थेला भरभराट निर्माण करून देईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वैभव वाघ,अरविंद धोंडगे,तोताराम गारोळे,भगवान वायाळ,भानुदास देव्हडे,राजेश बळी,पुंडलिक मोरे,रमेश काटे,सुनील गट्टानी,शरद ठाकरे,संतोष नाईकवाडे, शंकर चनखोरे,डॉ स्वप्नील गारोळे,डॉ महेश येवले,सौ शीतल धोंडगे,सौ संजीवनी पिसे, सौ नम्रता वाघ यांचेसह ऍड विनोद नरवाडे,ऍड विजय पाचरने,सूर्यकांत गाडेकर,राजेश भानापुरे,प्रशांत कायंदे,दत्तात्रय घनवट,संदीप सरकटे,प्रा गणेश शिंदे,अमोल मिरे,अशोकराव अडेलकर, रउफ शहा अब्दुल शहा,संदीप देशमुख, सौ सरला परतेती,उद्धवराव पिसे,विश्वनाथ धोंडगे विलास रहाटे,विनोद टाकतोडे,शंकर ठाकूर,मनोज जाधव,संतोष बंगाळे, खनपटे,पशुपती दळवी,सूर्योदय ग्रुप, टायगर २० ग्रुप,पटवारी संघटना, महसूल संघटना पदाधिकारी,रामनगर मित्रमंडळ आदी हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात वक्ते सिद्धेश्वर पवार यांनी केले.तर आभार भगवानराव वायाळ यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचार्यानी,स्वामी समर्थ सेवा समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.
शिवानी वायाळ व सिद्धेश्वर पवार यांचा केला सत्कार
सौ शिवानी धनंजय वायाळ ही बी एस्सी नर्सिंग परीक्षेत चार ही वर्ष राज्यातून प्रथम आल्याने तिचा महामहिम राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्याबद्दल ह्या कार्यक्रमात तिचा सत्कार करण्यात आला तर प्रख्यात वक्ते सिद्धेश्वर पवार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
Users Today : 213