शेंदूर्जन:-तालुका प्रतिनिधी
या परिसरात गुरूवारी मेघ गर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. दरम्यान, चक्रिवादळामुळे शाळेवरील टिनपत्रे उडाली. यावेळी क्रिकेट खेळणारे विद्यार्थी जयमी झाले असून गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थ्यांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार
सुरू आहेत. शेंदुर्जन येथे ३ एप्रिल रोजी ५ वाजता मेघ गर्जनेसह पावसाला सुरूवात झाली.जवळपास पाऊण तास पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, चक्रीवादळामुळे परिसरातील शिवप्रसाद चौधरी या शाळेवरील टिन पत्रे उडालो, त्यामुळे प्रांगणात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना टिन लागल्याने काही मुले किरकोळ जखमी, तर शिवराज किशोर शिंगणे हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला मेहकर येथील हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. या पावसामुळे जागोजागी काही झाडे सुद्धा कोसळलेली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतातील कांदा, गहू, ज्वारी अशी पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
Users Today : 213