चिखली तालुक्यालाही आस्मानी फटका

Khozmaster
1 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

तालुक्यात २ एप्रिलच्या रात्री वादळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान णाले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, या नैसर्गिक आपत्तीत १२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
पपई ९ हेक्टर, कांदा (बियाणे) १ हेक्टरचे नुकसान झाले आहे. एकूण २३ शेतकऱ्यांची हानी झाली आहे. टाकरखेड मुसलमान येथील १८ शेतकऱ्यांच्या पपई पिकाचे ९ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. तर, कांदा (बियाणे) ४ शेतकऱ्यांच्या १ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. आंबा पिकाचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग या नुकसानीचे पंचनामे करून पुढील कार्यवाही करतील, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली आहे.

0 9 5 4 8 7
Users Today : 213
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *