लहूजी साळवे स्मृति राज्यस्तरीय पुरस्काराने श्रीकृष्ण शिंदे सन्मानित

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

क्रांतिगुरु लहूजी साळवे यांच्या स्मृतिदिनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष व बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे स्वीय सहायक श्रीकृष्ण शिंदे यांना फोरमचे राज्याध्यक्ष विजय अंभोरे यांच्या हस्ते लहूजी साळवे स्मृति राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.लोणार तालुक्यातील गुंधा येथील आद्य क्रांतिगुरु लहूजी साळवे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांचा आद्य क्रांतिगुरु लहूजी साळवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार देण्यात येतो.यंदाचा पुरस्कार श्रीकृष्ण शिंदे यांना जाहीर झाला. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा उत्तर विभागाचे सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष ओम नाटेकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर मानवतकर, रामेश्वर जाधव, तालुकाध्यक्ष गजानन गायकवाड, जाफराबादचे सरपंच पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

0 9 5 4 8 7
Users Today : 213
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *