मामाने भाचीलाच बनवले वासनेची शिकार ! मोताळा तालुक्यातील संतापजनक घटना

Khozmaster
1 Min Read

मोताळा:-तालुका प्रतिनिधी 

एका नराधम मामाने मामा-भाचीच्या नात्याला कलंकित करणारे संतापजनक कृत्य केल्याची घटना तालुक्यातील एका गाव शिवारात उघडकीस आली. ४९ वर्षीय मामाने सख्ख्या भाचीवर बलात्कार केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.मामाने भाचीलाच वासनेची शिकार बनविल्याने तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी मामा व पीडित भाचीचे गाव वेगवेगळे, पण मोताळा तालुक्यातच आहे. १९ वर्षीय पीडित तरुणी घरकाम करते. तसेच आई, वडिलांना शेतीकामामध्ये मदत करते. ४९ वर्षीय मामाने १५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पुन्हा दोनवेळा भाचीवर बलात्कार केला. याबद्दल वाच्यता केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मामाकडून त्रास वाढतच गेल्याने पीडित मुलीने बोराखेडी पोलीस स्टेशन गाठून फिर्याद नोंदविली. या प्रकरणात आरोपी मामा गजाननवर भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम ६४ (१), ६४ (२) (ट), ३५१ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. अधिक तपास पीएसआय राजेंद्र कपले हे करीत आहेत. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

0 9 5 4 8 7
Users Today : 213
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *