चिखली:-तालुका प्रतिनिधी
शेतीबर आधारीत असलेल्या ग्रामीण भागात विपरीत परिस्थीती आणि शेतमालाच्या पडलेल्या भावामुळे, दिलेले कर्ज वसुल करणे बँकांसाठी अवघड होत चालले आहे. अर्बन बँकाच नव्हे तर राष्ट्रीयकृत बँकेतील देखील थकीत कर्जाचे डोंगर वाढत असतांना, थकीत कमी करण्यासाठी बँका संघर्ष करीत आहेत. परिसरातील कोणतीच बँक शुन्य टक्के थकीत आतापर्यंत एकदाही साध्य करू शकली नसतांना, अनुराधा अर्बन बँकेने मात्र सलग चार वर्ष शुन्य टक्के थकीत चा विक्रम साध्य करत सलग इतरांसाठी दिपस्तंभा प्रमाणे कामगिरी केली आहे.नुकताच बँकेला भारतीय रिझर्व बँकेकडुन मिळालेला टैंड चा दर्जा, बँकेच्या आर्थीक स्थिरतेचे आणि उत्कृष्ट यवस्थापनाचे प्रमाणीकरणच असल्याचे व बँकेने उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करून ग्राहकांचा विष्वास जिंकण्यात यषस्वी ठरले आहे. तर बँकेने १०० कोटी ठेवीचा पल्ला पार करीत विदर्भातील सहकार क्षेत्रात यषस्वी गगण भरारी घेतली असल्याचे बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितले.अनुराधा अर्बनच्या प्रगतशिल वाटचाली बाबत प्रसार माध्यमाशषी बोलतांना राहुल बोंद्रे म्हणाले की, ऋर्षीतुल्य कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी सन १९९९ मध्ये अनुराधा अर्बन बँकेची स्थापना केली आणि त्या दिवसापासुन बँकेने सातत्याने प्रगतीपथावर बाटचाल केली आहे. आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर बँकेने १०० कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला असुन, चिखली परिसरातील शेतकरी, लघु उद्योजक आणि विविध गरजूंना कर्ज वाटपाव्दारे आर्थिक स्थैर्य प्रदान केले आहे. या प्रयत्नांमुळे अनेकांचे जिवनमान उंचावले असून समाजात सकारात्मक बदल घडून आला आहे. तर बँकेचे उपाध्यक्ष डॉ. विष्वनाथ यादव म्हणले की सस्थेचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या दुरदृष्टीमुळे आणि कल्पक व्यवस्थापनामुळे गेल्या चार वर्षापासुन बँकेचे थकीत कर्ज शुन्य टक्के, अशी बँकेची ही उल्लेखणीय कामगिरी अत्यंत कौतुकास्पद असुन, तिच्या नफ्यातील सातत्यपुर्ण वृध्दीचेही हेच कारण आहे. तांत्रिक प्रगतीला अनुसरून बँकेने मोबाईल बँकींग, क्युआर कोड पेमेंट, आणि आधुनिक डिझीटल सेबा पुरवण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना जदल, सुरक्षीत आणि सुलभबँकींग अनुभव मिळतो आहे.कटाने आणि मेहनतीने मिळविलेला पैसा हा बँकेमध्ये सुरक्षित राहीला पाहीजे ही प्रत्येकाची ईच्छा असते. सुरक्षित ठेवींसाठी विष्वासाचे दुसरे नाव म्हणजे अनुराधा अर्बन बँक असल्याचे चार वर्षाचे परिणाम सिध्द करीत आहे. बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ. विष्वनाथजी यादव, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गायके, तसेच समर्पित कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे अथक परिश्रम आणि समर्पण यामुळेच बँकेने आर्थिक स्थैर्य आणि विष्वासार्हतेची नवी उंची गाठली आहे ही बाब सहकार चळवळीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
Users Today : 213