बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे ७ एप्रिल रोजी तीन दिवसीय बुलढाणा जिल्हा येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यावर दौरा कार्यक्रमानुसार ७ एप्रिल रोजी मुंबई येथून सोईनुसार शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव. ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे टंचाई आढावा बैठकीस उपस्थिती, सायं. ४ वा. स्थानिक पदाधिकारी यांच्या बैठकीला उपस्थिती, बुधवार ९ एप्रिल रोजी सकाळी शासकीय बुलडाणा ११ वाजता विश्रामगृह येथे अभ्यागतांसाठी राखीव व त्यानंतर दुपारी कै. कैलास नागरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर सोईनुसार पुणेकडे रवाना होतील.
Users Today : 213