डॉ. विशाल इंगोले स्मृतिसाहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Khozmaster
1 Min Read

किनगाव राजा:-विशेष प्रतिनिधी 

आपल्या काव्यप्रतिभेने अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचा अमीट ठसा उमटवीणारे स्मृतिशेष कवी डॉ. विशाल इंगोले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्मृतीसाहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ६ एप्रिल रोजी लोकजागर परिवार तसेच डॉ. विशाल इंगोले मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘माझ्या हयातीचा दाखला’ या काव्यसंग्रहाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर डॉ. विशाल इंगोले यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. स्व विशाल इंगोले हे उत्तम चित्रकार तसेच मराठी विश्वाकोष मंडळाचे सदस्यही होते.त्यांच्या कविता मराठवाडा विद्यापीठ व अमरावती विद्यापीठमध्ये अभ्यासक्रमला आहेत. गत्वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यामुळेच त्यांच्या काव्यस्मृतीला उजाळा मिळावा म्हणून त्यांच्या चाहत्यांनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. सामाजिक, राजकीय तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती लाभणार असून यामध्ये माजी मंत्री तथा विदर्भ मार्केटिंग फेडरेशन नागपूरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. सिद्धार्थ खरात, भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी, विचारवंत तथा लेखक श्रीकांत देशमुख अध्यक्षस्थानी तर प्रमुख अतिथी सेवासंकल्प प्रकल्पाचे संस्थापक नंदकुमार पालवे यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
दुसरबीड येथील गीतांजली मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजेच्या दरम्यान स्मृती सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती लोकजागर परिवाराचे विश्वस्थ प्रवीण गीते व डॉ. विशाल इंगोले मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

0 9 5 4 9 2
Users Today : 218
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *