बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बुलढाणा येथील हिरकणी महिला प्रभागसंघ रायपूरची विशेष बैठक ग्रामपंचायत पिंपळगाव सराई येथे ३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, प्रकल्प संचालक राजेश इंगळे आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव उपस्थित होते.प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांनी काही नाविन्यपूर्ण उपक्रमांवर तसेच गावात उपलब्ध नसलेल्या व्यवसायांवर भर देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. शिलाई मशीनद्वारे स्कूल ड्रेस कोड तयार करण्यावर तसेच काही इतर शालेय उपयुक्त, नियमित वापरापयोगी वस्तू बनवण्याबाबत नाविन्यपूर्ण संकल्पना सुचवल्या. व्यवसायाची निवडीमुळे स्वतःला जरी रोजगार उपलब्ध झाला. परंतु, त्यातून इतर समूहातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत असावा, असे सांगितले. प्रकल्प संचालक इंगळे यांनी यांनी व्यवसायाबाबत महिलांच्या संकल्पना, येणाऱ्या समस्या, विषयी मार्गदर्शन केले. समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला इतर समूहातील महिलांनी प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे जेणेकरून ती महिला स्वतः प्रोत्साहित होऊन आपला व्यवसाय जोमाने करेल. जिल्हा उद्योग केंद्र तसेच इतर सबसिडी च्या बँकेतील योजनेबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला पिंपळगाव सराईच्या सरपंच रुपाली तरमळे, ग्रामसेवक मानकर, तालुका अभियान व्यवस्थापक श्रीपाल सोनटक्के, प्रभाग समन्वयक निलेश इंगळे, गिरीधर हिवाळे, दत्तात्रेय तळेकर, आरोग्य सेविका, तसेच गावातील पदाधिकारी तसेच हिरकणी महिला प्रभागसंघ रायपूर गणातील १३ ग्रामपंचायतीतील ग्रामसंघ पदाधिकारी व समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित होते.
Users Today : 218