देऊळगाव घुबे:-विशेष प्रतिनिधी
अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अ, ब, क, ड उप वर्गीकरण व इतर मागण्यांसाठी चिखली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने निवेदन देण्यात आले.संस्थापक अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या मार्गदर्शनाने व दिगंबर तुकाराम पाटोळे विदर्भसंघटक व प्रदीप रतन साळवे जिल्हा संघटक यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण तातडीने करावे, क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सरकारने स्वीकारलेल्या शिफारशीची तत्काळ अंमलबजावणी करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयानुसार राज्य सरकारला आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, अनुसूचित जातीतील ५९ जातीची आजची लोकसंख्या गृहीत धरून वर्गीकरण करावे, मागील २० वर्षांत सरकारने स्वीकारलेल्या ६८ शिफारशींना बजेटसह तरतूद करून अंमलबजावणी करावी. मागण्या मान्य न झाल्यास २० मे २०२५ रोजी आझाद मैदानावर राज्यातील सकल मातंग समाज आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला. यावेळी विदर्भसंघटक दिगंबर पाटोळे, तुकाराम उबाळे, प्रदीप साळवे, कुंदन यंगड, विजय निकाळजे, शुभेच्छा अंभोरे, शेषराव साळवे, किरण बोरकर, सुमंता साळवे उपस्थित होते.
Users Today : 218