एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थ्यांची निवड संग्रामपूर जिल्हा परिषद शाळेची यशस्वी परंपरा

Khozmaster
1 Min Read

संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी 

संग्रामपूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेत पुन्हा एकदा आपली विजयी परंपरा कायम राखली असून शाळेतील एकूण ९ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.कैवल्य गोतमारे, प्रिया भारसाकळे, प्रेम उमाळे आणि सोहम होळकर अशी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील शिक्षक आणि पालकांनी त्यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे, शासनाने २०१२ मध्ये ही परीक्षा सुरू केल्यापासून, जिल्हा परिषद हायस्कूल, संग्रामपूरचे विद्यार्थी नियमितपणे एनएमएमएस परीक्षेत सहभागी होत आहेत आणि सातत्याने यश संपादन करत आहेत. यावर्षीही शाळेने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक योगेश कुकडे यांनी सांगितले की, आमच्या शाळेतील विद्यार्थी सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. एनएमएमएस परीक्षेत मिळालेले हे यश विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. शासनाने २०१२ मध्ये ही परीक्षा सुरू केल्यापासून विद्यार्थी परीक्षेत सहभागी होत आहे आणि पात्र ठरत आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे, असे सांगितले.

0 9 5 4 9 2
Users Today : 218
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *