व्यंकटेश महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी 

येथील व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला.उन्हाळी २०२४ च्या विद्यापीठ परीक्षेत पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरित करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी छायाराजे जाधव यांची विशेष उपस्थिती होती. संत भगवान बाबा महाविद्यालय, सिंदखेडराजा येथील प्राचार्य डॉ. किशोर वळसे व व्यंकटेश महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत आवटी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते. यावेळी प्राचार्य डॉ. किशोर वळसे, प्रा. डॉ. अनंत आवटी, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. मधुकर जाधव, प्रास्ताविक समन्वयक प्रा. बाळासाहेब काळे तर अतिथी परिचय डॉ. ज्योती ढोकले यांनी करून दिला. प्रमाणपत्र वाचन प्रा. सोपान चव्हाण यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा. मंदार जोशी यांनी मानले. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची नोंदणी प्रा. सुनील पवार व प्रा. डॉ. राहुल खवल यांनी करून घेतली. या कार्यक्रमात कला, वाणिज्य, विज्ञान व बी. व्होक. शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 5 4 9 2
Users Today : 218
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *