शॉर्टसर्किटमुळे ज्वारीचे पीक जळून खाक

Khozmaster
0 Min Read

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी

शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून एका एकरातील ज्वारीचे उभे पीक जळून खाक झाले. दगडवाडी शिवारात १० एप्रिलच्या दुपारी ही घटना घडली.सुधाकर बाजीराव जायभाये यांनी उन्हाळी ज्वारीची पेरणी केली होती. विद्युत तारांचे घर्षण झाल्याने आग लागली. आगीत एका एकरातील ज्वारीचे पीक भस्मसात झाले. शेतात गव्हाचे काड असल्यामुळे आग दूरपर्यंत पसरली. शेतकऱ्याची मोठी आर्थिक हानी झाली. महावितरण कंपनीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
0 9 5 4 9 2
Users Today : 218
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *