ठाणेदार ठाकरेंच्या ‘अकाली’ बदलीने संभ्रम ‘वड्याचं तेल वांग्यावर’ काढल्याची चर्चा

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:- जिल्हा प्रतिनिधी 

आपल्या शिस्तप्रिय कारकिर्दीने पोलीस व जनतेमध्ये सुसंवाद निर्माण करणाऱ्या बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची १६ एप्रिल रोजी अचानक बदली झाली. बदलीचे नेमकं कारण समजू शकले नसले, तरी ‘वड्याचं तेल वांग्यावर’ काढल्याची जोरदार चर्चा सद्या बुलढाणा पोलीस दलात रंगली आहे. तर दुसरीकडे बुलढाणा पोलीस घटकात विविध ठिकाणी नेमणूकीवर असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी १६ जानेवारी २०२४ रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून पद्भार घेतला. आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीत पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी सर्वप्रथम पोलीस व जनतेमध्ये सुसंवाद निर्माण करुन नागरिकांच्या मनात पोलिसांप्रती विश्वास निर्माण केला. गेल्या वर्षभरात पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीदरम्यान जिल्हाभरात स्फोटक वातावरण असतांना, बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दित एकही अनुचित घटना घडली नाही. निवडणूकांदरम्यान विविध राजकीय राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांसह व्हीव्हीआयपींचे दौरे शांततेत पार पाडून घेतले. सोबतच जालना जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलन पेटलेले महाराष्ट्र शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ व ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ उपक्रम शांततेत पार पाडून घेतले. त्यांच्या एक वर्षाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणारी एकही घटना शहरात घडल्याचे उदारण नाही, हे विशेष! असे असतांना १६ एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची पोलीस नियंत्रण कक्ष (खामगाव) येथे अचानक बदली करण्यात आली. बदलीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, या अकाली बदलीमुळे बुलढाणा पोलीस दलातच नाही, तर सुज्ञ व कायदाप्रिय शहरवासियांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून विविध चर्चेला पेव फुटले आहे.

0 9 5 4 9 2
Users Today : 218
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *