शेगाव:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील बोंडगावसह काही गावामध्ये केसगळतीबाधितांची आता नखगळती होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीची वातावरण आहे. नखगळती का होतेय, याचा शोध घेण्यासाठी सोमवारी पुणे येथील आरोग्य सेवा विभागाच्या सहसंचालक डॉ. बबीता कमलापूरकर यांच्या नेतृत्वात आरोग्य पथक बोंडगाव येथे दाखल झाले आहे. पथकाने रुग्णांशी चर्चा करून समस्येविषयी माहिती जाणून घेण्यात आली. आधीच केसगळतीचा अहवाल आयसीएमआर या संस्थेकडून प्राप्त झाला नाही. त्यात नखगळतीची नवी समस्या निर्माण झाल्याने सहसंचालकांसमोर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तालुक्यात केसगळती व टक्कल आजारावर चार महिन्यांनंतरही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा (आयसीएमआर) अहवाल बाहेर आलेला नाही. यामुळे बाधित गावे आणि रुग्णांतील भीती कायम आहे. या पाठोपाठ शेगाव तालुक्यात आता नखगळतीचे संकट उभे ठाकले आहे. ग्रामस्थांची नखे कमकुवत होऊन गळून पडत आहेत. बाधित गावांत जिल्हा आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे.दरम्यान, त्याचवेळेस दिल्ली येथील आयसीएमआरच्या पथकाने हे या गावात पोहोचून केस, नखं, अन्नधान्य, पाणी रक्तांचे नमुने घेऊन गेले होते. मात्र त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आचार्य व्यक्त होत असतानाच आता नख गळतीचे रुग्णसमोर येत असल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आज सोमवार, २२ एप्रिल रोजी पुणे येथील विशेष आरोग्य चमू शेगाव तालुक्यात दाखल झाली. बोंडगाव, कठोरा या गावांना चमुने भेट दिली. पुणे येथील आरोग्य सेवा विभागाच्या सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी बाधित रुग्णांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, तालुका आरोग्य अधिकारी बाहेकर, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी होते. ग्रामस्थांनी घाबरू नये : डॉ. कमलापूरकर नखगळतीबाबत तपासण्या सुरू केल्या आहेत. उद्या, २३ एप्रिल रोजी दिल्लीचे आरोग्य पथक दाखल होणार आहे. गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. पथकाला सहकार्य करावे. लवकरच निष्कर्ष काढून उपाययोजना केल्या जातील, असे डॉ. बबीता कमलापूरकर यांनी सांगितले.रुग्णसंख्या ६० वर २० एप्रिलअखेर रुग्णसंख्या ६० च्या घरात पोहोचली आहे. पहिल्या दिवशी १७ एप्रिलला रोजी केलेल्या सर्वेक्षणाअंती शेगाव तालुक्यातील चार गावांत नखगळतीचे तब्बल ३७ रुग्ण आढळून आले होते. यातील बरेच रुग्ण केसगळतीचे आढळून आले. १८ एप्रिल रोजी आरोग्य यंत्रणांनी शेगाव तालुक्यातील बोंडगाव केलेल्या पाहणीत नखगळतीचे आणखी तीन रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे रुग्णसंख्या ४० वर गेली. १९ ला देखील सर्वेक्षण करण्यात आले आहे. या पाहणीत आणखी १४ रुग्ण आढळून आले. २० तारखेला आणखी ३ रुग्ण आढळल्याने नखगळतीची रुग्णसंख्या ६० च्या घरात गेली आहे. शेगावमधील कठोरा, मच्छिंद्रखेड, बोंडगाव, घुई, कालवड या गावात नखगळतीची तीव्रता जास्त आहे. यात वाढच होत असल्याचे चित्र आहे. परिणामी शेगाव, खामगाव आणि शेगाव तालुक्यातील टक्कलबाधित सोळा गावात आता नखगळतीच्या विचित्र आजाराची भीती पसरली आहे.
Users Today : 218