चिखली आगाराचा वाहक ठरला उष्माघाताचा बळी बुऱ्हाणपूर-चिखली बसवर होता कर्तव्यावर

Khozmaster
1 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या चिखली आगारात कार्यरत असलेले वाहक संजय मोरे यांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. २० एप्रिल रोजी चिखली ते बुऱ्हाणपूर बसवर ते कर्तव्यावर होते. आगारात परतल्यानंतर रात्री आठ वाजता परतल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास आठ तासांनी त्यांचा मृत्यू झाला.शेलूदचे रहिवासी असलेले संजय भगवान मोरे (३७) हे वाहक असून, बुऱ्हाणपूर येथून परतीच्या मार्गावर बसमध्ये ड्युटी करीत होते. २० एप्रिल २०२५ च्या रात्री ८ वाजता आगारात परतल्यानंतर मोरे यांनी काही कर्मचाऱ्यांजवळ आपल्याला उष्णतेचा त्रास होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने २१ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता डॉ. मिसाळ यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. संजय मोरे उष्माघाताचे बळी ठरले. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ आणि भीती व्यक्त होत आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.तीव्र उन्हाळ्याच्या काळात कर्मचाऱ्यांच्य आरोग्याची योग्य काळजी घेणे आणि आवश्यक उपाययोजना करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे; परंतु केवळ उत्पन्न आणा म्हणून बजावत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

0 9 5 4 9 2
Users Today : 218
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *