लोणार:-तालुका प्रतिनिधी
कामे ट्रॅक्टर व अन्य शेती उपकरणांनी करण्यात येत आहेत. नांगरी, रोटर मारणे, फवारणी, सरी पाडणे आदी कामांसाठी यंत्राचा वापर होत असल्याने वेळेची बचत होत आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परिणामी मशागतीच्या कामांचा दरही वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, मशागतीचे दर दुपटीने वाढले आहेत.जिल्ह्यात शेतीतील मशागतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. सध्या रब्बी हंगामा आटोपला असून, शेत खाली होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी नांगरी, रोटाव्हेटर मारणे, जमिनीची लेव्हलिंग करून घेणे, वखरणी आदी कामे सुरू केली आहेत. बैलजोडी अभावी अल्पभूधारक शेतकरीही ट्रॅक्टर वापरत आहेत. नांगरणी करण्यापासून रोटर मारणे, फणाटणी, वखरणी आदी पूर्व मशागतीची सर्वच कामे ट्रॅक्टरद्वारे केली जात आहेत.द्राक्ष, डाळिंब बागांमध्ये फवारणीसाठीही ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे, यांत्रिकीरणामुळे शेतकऱ्यांच्या वेळेत बचत होत असून, शारीरिक पश्रिमाची कामे कमी झाली आहेत. असे असेल तरी यंत्रांणी करण्यात येणाऱ्या कामांसाठी रोख पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नांगरणी, फणाटणी, वखरणी, रोटा व्हेटर चावलणे, फवारणी आदी कामांचे दर ट्रॅक्टर चालकांनी वाढवले आहेत.पूर्वर्वीपेक्षा नांगरी, वखरणी, फणाटणी भाटी कामांमानी एकरी 100 ते 2000 रुपये अधिक द्यावे लागत आहे. नागरणीचे एकरी दर १७०० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वच कामासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागत असल्याने आतापासून उसनवारी करावी लागत आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी शेती कामांसाठी तसेच विहीर खोदणे, बांध बंदिस्तीची कामे करण्यासाठ जेसीबी
यंत्राचा वापर करतात.जेसीबी यंत्राला मोठ्या प्रमाणात डिझेल लागते, शिवाय देखभालीचा खर्चही अधिक असतो. त्यामुळे जेसीबी मालकांनी प्रतितास कामाचे १३०० रुपये केले आहेत. इंधन दरवाढीमुळे उन्हाळी कामांसाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च येत आहे. एकंदरीत उन्हाळी काढणीपासून तर पीक विक्रीपर्यंतचा खर्च पाहता हातात काहीच पडत नसल्याचे शेतकरी मांगत आहेत.
Users Today : 218