भाजपा शहराध्यक्षपदी संतोष बोंबटकार यांची निवड

Khozmaster
1 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्षाच्या मलकापूर शहर अध्यक्ष पदाकरिता संतोष बोंबटकर यांची निवड करण्यात आली. भाजपा संघटनात्मक पातळीवर झालेल्या या निवडणुकीनंतर येथील भाजपा कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत भाजपा संघटनात्मक निवडणूक प्रमुख ज्ञानदेव मानकर यांनी ही घोषणा केली.यावेळी अमृत बोंबटकर, यश संचेती, मोहन शर्मा, मिलिंद डवले, अरविंद किनगे, रामभाऊ झांबरे, नीलेश हिवाळे, संजय काजळे, संजय गावंडे, चंद्रकांत वर्मा, विनोद आकोटकर आदींसह प्रदेश सदस्य, जिल्हा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष पदाकरिता झालेल्या या निवडणुकीमध्ये प्रदेश कार्यकारिणीमध्ये विविध पदांवर कार्यरत पदाधिकाऱ्यांनी गुप्त मतदान पद्धतीने मतदान करत ही निवडणूक पार पाडली. या निवडणुकीचा अहवाल बंद पाकिटामध्ये प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवण्यात आला आणि त्यानंतर लोकशाही पद्धतीने या शहराध्यक्ष पदाची निवड झाली असल्याचे शहर अध्यक्ष शंकर पाटील यांनी कळविले. आ. चैनसुख संचेती, खा. रक्षाताई खडसे यांचे मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच तळागाळातील जनसामान्यांना शासन व प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या बाबत जनजागृती करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी प्रतिक्रिया यावेळी नुतन शहराध्यक्ष संतोष बोंबटकार यांनी दिली.

0 9 5 4 9 6
Users Today : 222
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *