एसपीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कृषी आधारित उद्योग अभ्यास भेट

Khozmaster
1 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

स्थानिक एसपीएम तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयातील बीए भाग एक व बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार औद्योगिक क्षेत्रातील कृषी आधारित उद्योग क्षेत्रास अभ्यास भेट दिली.विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक संशोधनाला वाव मिळण्याच्या उद्देशाने अर्थशास्त्र नियोजन मंडळाच्या वतीने कृषी आधारित त्रिज्या इंडस्ट्रीज तसेच देव नमकीन क्षेत्रास ही अभ्यास भेट देण्यात आली. चालणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्याविषयी व्यावसायिक ज्ञान व कामकाजाविषयी तसेच कार्याविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत स्वरुपात माहिती करवून, विद्यार्थ्यांना कामकाजाचे प्रात्यक्षिक करून दाखवून विद्यार्थ्यांकडून काही प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली.
त्रिग्या इंडस्ट्रीजचे संचालक धनंजय खरात व देव नामकीनचे संचालक राजरत्न खरात यांनी सखोल माहिती दिली. औद्योगिक प्रक्रियेतील तांत्रिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहून व शिकून करवून घेतली. विविध यंत्रांचे कार्य व प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांनी करवून घेतली. उत्पादकतेच्या वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांविषयी विद्यार्थ्यांनी माहिती करवून घेतली. अभ्यास भेटीचे समन्वयक प्रा.डॉ. दिलीप महाजन यांनी आभार मानले. यावेळी प्रा.डॉ. सुभाष राऊत उपस्थित होते.

0 9 5 4 9 6
Users Today : 222
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *