नद्यांची स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू: आतापर्यंत 39.04 कि.मी. सफाई, 30 हजार क्युबिक मीटर गाळ हटवला
नागपूर | 15 मे 2025 : पावसाळ्यापूर्वी संभाव्य पुराच्या धोका टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. आतापर्यंत या अभियानात एकूण 39.04 किलोमीटर नदी पात्राची सफाई करण्यात आली असून 30 हजार 65 क्यूबिक मीटर गाळ हटवण्यात यश आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. नदीपात्रातील गाळ हटवून पावसाचे पाणी निर्बंध न होता वाहू देणे, ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
नदी स्वच्छतेचा आढावा:
नाग नदी (लांबी: 16.58 किमी): पाच टप्प्यांत 11.84 किमी सफाई, 20,254 क्युबिक मीटर गाळ उपसा
पिवळी नदी (लांबी: 17.42 किमी): तीन टप्प्यांत 14.45 किमी सफाई, 4,610 क्युबिक मीटर गाळ उपसा
पोहरा नदी (लांबी: 15.17 किमी): तीन टप्प्यांत 12.76 किमी सफाई, 5,201 क्युबिक मीटर गाळ उपसा

या मोहिमेत एकूण 9 पोकलेन, 1 जेसीबी आणि 1 टिप्पर वापरले जात असून स्वच्छता कार्य वेगाने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व नद्यांची स्वच्छता पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मनपाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी दिली.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे नागपूर शहरात पावसाळ्यातील पूर परिस्थिती टाळण्यास मोठा हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Users Today : 11