रामनगरातील 24×7 OCW पायलट प्रोजेक्ट कागदावरच; नागरिकांचा तीव्र आक्रोश

KHOZ MASTER
1 Min Read

रामनगरातील 24×7 OCW पायलट प्रोजेक्ट कागदावरच; नागरिकांचा तीव्र आक्रोश

रामनगर : रामनगर परिसरात 24×7 पाणीपुरवठ्याचा OCW (ऑरेंज सिटी वॉटर) चा पायलट प्रकल्प सुरू होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, हा प्रकल्प फक्त कागदावरच असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. नागरिकांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रामनगर भागात रोज संध्याकाळी 4 ते 5 तास पाणीपुरवठा बंद राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. शनिवारी ४.१५ ते १०.१० या वेळेत पाणीपुरवठा बंद होता. रविवारी पाणीपुरवठा 5.45 वाजता बंद झाला. पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता, अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात येतो. मात्र, “आमचे काम 24×7 पाणी देणे आहे, पाण्याच्या दाबाचा काही संबंध नाही,” असे उत्तर मिळते.

रामनगर हा 24×7 पाणीपुरवठा असलेला क्षेत्र असूनही, नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. काही वर्षांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. दक्ष नागरिकांनी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा केल्यानंतर संध्याकाळी कमी दाबाने का होईना, पण नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.

मात्र, प्रत्येक वेळी झोन इंजिनिअर बदलला की ही समस्या पुन्हा डोके वर काढते. नागरिकांनी OCW ला तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे, अन्यथा या समस्येवर पुन्हा कायदेशीर मार्गाने उपाययोजना करण्यात येईल असा इशाराही दिला आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *