पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा १८ मे ला जन संवाद कार्यक्रम

KHOZ MASTER
1 Min Read

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या जनसंवाद कार्यक्रम

नागपूर | १७ मे २०२५

राज्याचे महसूल मंत्री तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या, १८ मे रोजी (रविवार) नागपूरमध्ये जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. नागपूरमधील जिल्हा नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत नागरिकांना भेट देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात मंत्री महोदय नागरिकांची लेखी स्वरूपातील निवेदने स्वीकारतील. त्यांच्यासोबत थेट संवाद साधत नागरिकांच्या समस्या, अडचणी व मागण्यांचा आढावा घेतील. उपस्थित नागरिकांनी आपल्या निवेदनासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान हार, पुष्पगुच्छ इत्यादी आणण्यास मनाई असून, केवळ लेखी निवेदनेच स्वीकारली जातील. नागरिकांनी या संवादासाठी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *