बिरसा क्रांती दलाची रवीभवनात बैठक संपन्न यवतमाळात होणाऱ्या आदिवासी सन्मान परिषदेसाठी नियोजन

KHOZ MASTER
1 Min Read

बिरसा क्रांती दलाची रवीभवनात बैठक संपन्न

यवतमाळात होणाऱ्या आदिवासी सन्मान परिषदेसाठी नियोजन

नागपूर – बिरसा क्रांती दलाचे संस्थापक व अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी रवीभवन, नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत 9 जून रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या आदिवासी सन्मान परिषदेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. ही परिषद बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येत असून, राज्यभरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

बैठकीत यवतमाळ येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या. यावेळी डी. बी. अंबूरे, संतोष चांदेकर, धनराज मसराम, डॉ. अर्जुन कोडापे, सागर कोकर्डे, नलिनी गेडाम यांच्यासह अनेक नवीन पदाधिकारी उपस्थित होते. यांना नव्या जबाबदाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली.

क्रांती बिरसा दलाच्या एकमताने ही बैठक यशस्वीरीत्या पार पडली असून, आदिवासी समाजाच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *