नागपूर वाहतूक पोलीस विभागाकडून सिताबर्डी मेन रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण अधिसूचना

KHOZ MASTER
2 Min Read
Oplus_131072

नागपूर वाहतूक पोलीस विभागाकडून सिताबर्डी मेन रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण अधिसूचना

 

नागपूर | १८ मे २०२५ – नागपूर शहरातील वाहतुकीच्या वाढत्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी पोलीस उप आयुक्त (वाहतूक) अर्चित चांडक यांनी सिताबर्डी मेन रोडवरील नवीन वाहनतळ नियमावली जाहीर केली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निर्देशानुसार पथविक्रेते हटवण्यात आलेल्या या मार्गावर आता नियोजित वाहनतळ निर्माण केला जाणार आहे.

नवीन अधिसूचनेनुसार, वाहतुकीस अडथळा होऊ नये आणि नागरिकांना पार्किंगसाठी योग्य जागा मिळावी, यासाठी खालील ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे:

व्हेरायटी चौक बाला फुटवेअर ते राजा ऑप्टीकल्स: डाव्या बाजूस फक्त दुचाकी

सिल्की लॉक्स ते आदिग्रामोद दुकान: डाव्या बाजूस दुचाकी

जोशी आईस्क्रीम ते पारेख ज्वेलर्स (जुने दुकान): डाव्या बाजूस दुचाकी (विशिष्ट स्थळे वगळून)

व्हेरायटी चौक बाटा शोरूम ते नॉवेल्टी: उजव्या बाजूस चारचाकी

बॉम्बेवाला दुकान ते ड्रीम शॉपी: उजव्या बाजूस चारचाकी

व्यंकटेश मार्केट ते पारेख ज्वेलर्स: उजव्या बाजूस दुचाकी (मोदी नं. १, २, ३ वगळून)

या अधिसूचनेनुसार, पार्किंग क्षेत्राच्या ३० मीटरच्या आत कोणत्याही पथविक्रेत्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

ही अधिसूचना १९ मे २०२५ पासून लागू होणार असून पुढील आदेशापर्यंत अमलात राहणार आहे. नागपूर महानगरपालिकेने संबंधित ठिकाणी पांढरे पट्टे व स्पष्ट पार्किंग बोर्ड लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांनी नवीन वाहतूक व पार्किंग नियमानुसार सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर वाहतूक पोलीसांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *