मेडिकलमध्ये ७९२ नवीन पदांची भरती होणार देशोन्नती वृत्तसंकलन नागपूर विभागाला मिळणार ७९ पेक्षा जास्त शिक्षक

KHOZ MASTER
1 Min Read

नागपूरः राज्य सरकारच्या अखत्यारितील मेडिकल कॉलेजेसमध्ये फॅकल्टी व डीन पदांची पदे रिक्त आहे. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. डीएमआयआरने ७९२ रिक्त पदांची लवकरच प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. नागपूर विभागात ७० पेक्षा अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. मेडिकल कॉलेजेसमध्ये शिक्षकांची कमतरता दूर होण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू झाले आहे.
मेडिकल कॉलेजेसमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने मेडिकल प्रशासनाला समस्या भेडसावत आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नागपूर
विभागाचे नुकतेच निरीक्षण केले. निरीक्षणात शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे आढळले. विविध मेडिकल कॉलेजेसमध्ये जागेच्या तुलनेत शिक्षकांची कमतरता आहे. कॉलेजमध्ये मंजूर जागांच्या तुलनेत शिक्षक नसल्याने जागा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे डीएमआयआरने याच महिन्यात शिक्षकांची रिक्त पदे वाढविण्याची प्रक्रिया सुरू झाली
आहे.
भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्यात येत आहे. यात सहायक प्रोफेसरकरिता वर्ग २ च्या नियुक्त्यांचा समावेश आहे. यात एनेस्थेसियोलॉजी (६७), रेडियोलॉजी (७८), एनाटॉमी (४६), जनरल मेडिसीन (५०), नेत्र विज्ञान (२६), प्रसूती व स्त्रीरोग (८३), मायक्रोबायोलॉजी (२३), फॉरेन्सिक मेडिसीन (२९), पॅथॉलॉजी (४८), सामुदायिक चिकित्सा (३१) आणि जनरल सर्जरी (६४) पदांचा समावेश आहे. आवेदन प्रक्रिया मे महिन्याच्या शेवटपर्यंत चालेल. अंतिम निवड प्रक्रियेस चार महिन्यांचा वेळ लागेल, असे सूत्रांनी सांगितले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *