माजी सैनिकांचा सहभाग, पाचशे फूट लांब तिरंगा आकर्षण ‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ तिरंगा यात्रा

KHOZ MASTER
1 Min Read

नागपूर : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या समर्थनार्थ माजी सैनिकांच्या सान्निध्यात भाजपतर्फे पायदळ तिरंगा यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेत पाचशे फूट लांब तिरंगा विशेष आकर्षण ठरले. रविवारी शहीद चौक इतवारी येथून पंडित बच्छराज व्यास चौक (बडकस चौक, महाल) पर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली.
बडकस चौकात आयोजित कार्यक्रमात भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी भाषणात ऑपरेशन सिंदूरने केवळ २८ मिनिटात पाकिस्तानची धरती हादरवून सोडली. पाकिस्तानच्या किराना हिल्सवरील ब्रम्हास्त्र मिसाईलच्या हल्ल्याने संपूर्ण पाकिस्तान थरथर कापायला लागला. त्यांच्याद्वारा सीजफायर करण्यासाठी याचना होऊ लागली. तेव्हा कुठे ऑपरेशन सिंदूर रोखण्यात आले. मात्र भविष्यातही ऑपरेशन सिंदूर सुरूच
राहील, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. दहशतवाद व दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा सज्जड दमही भरण्यात आला ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या समर्थनार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली असल्याचे तिवारी म्हणाले. शहीद चौक ते बडकस चौकापर्यंत पायदळ तिरंगा यात्रा काढण्यात आली. सर्व सहभागी लोकांनी गळ्यात तिरंगा दुपट्टा आणि हातात तिरंगा झेंडा घेतला होता. भारत मातेचा जयजयकार करण्यात आला. सैनिकांच्या सन्मानार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तिरंगा यात्रेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, संदीप जोशी, माजी आमदारडॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, संजय भेंडे, कुकडे, विष्णू चांगदे, राम अंबुलकर, रितेश गावंडे, सुबोध आचार्य, प्रगती पाटील, विक्की कुकरेजा इत्यादी सहभागी झाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *