महाठगाकडून १.४२ कोटीने फसवणूक टुरीझमसह इतर मोठे व्यवसाय असल्याची दिली थाप

KHOZ MASTER
2 Min Read

नागपूर : एका महाठगाने दुरीझमसह इतर व्यवसाय असल्याची थाप मारून इसमासह नातेवाईकांचा विश्वास संपादित केला. त्यांच्याकडून व्यवसायासाठी पैसे मागून परत न करता १ कोटी ४२ लाख ७७ हजारांनी फसवणूक केल्याचे प्रकरण बेलतरोडी पोलिस स्टेशन हद्दीत उघडकीस आले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करीत
महाठगाकडून १.४२ कोटीने फसवणूक
प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. चेतन रामू वानखेडे (४४), रा. न्यू शुक्रवारी, ढोबळे गल्ली, रामाजीची वाडी, गणेशपेठ असे आरोपीचे नाव आहे.
संजय सदाशिव चव्हाण (५२), रा. अखिल विश्वभारतीय को-ऑप. सोसायटी, बेसा व इतर नातेवाईक असे फिर्यादी इसमाचे नाव आहे. एका कार्यक्रमादरम्यान संजय चव्हाण आणि आरोपी चेतन वानखेडे याची ओळख नातेवाईकामार्फत झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी संजय हा
पत्नी, सासू-सासरे, बहिणी व नातेवाईक हे चारधाम यात्रेला गेले होते. तेथेही आरोपीसोबत भेट झाली. या भेटीदरम्यान आरोपी चेतन वानखेडे याने मीटुरीस्टचा व्यवसायकरीत असून त्यासोबतच मोठे मोठे काम करतो असे सांगितले. यादरम्यान त्याने टुरीस्ट आणि इतर मोठ्या कामासाठी भरपूर प्रमाणात पैसे लागत असतात आणि लाभही मोठ्या प्रमाणात मिळत असतो, असे गोडीगुलाबीने बोलून संजय चव्हाणसह त्याच्या नातेवाईकाचा विश्वास संपादित केला.
सुरुवातीला तो चव्हाण व त्यांच्या नातेवाईकाकडून रकमा घेऊन लाभासह परत करीत होता. त्यामुळे संजयसह त्यांच्या नातेवाईकाचा त्याच्यावर विश्वास बसला होता. याच दरम्यान त्याने दुरीस्ट आणि इतर मोठ्या कामासाठी पैशाची आवश्यकता आहे. काम झाले की, लाभासह पैसे परत करीन अशी थाप मारून ९ सप्टेंबर २०२३ ते १ जून २०२४ पर्यत संजय व त्याच्या नातेवाईकाकडून वेळोवेळी आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या रकमा घेतल्या

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *