डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासात 183 अडथळे आतापर्यंत प्रशासनाने केले केवळ २२ अडथळे दूर

Khozmaster
3 Min Read

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्रातील १८ विमानतळांपैकी एक आहे. येथून मुंबई व दिल्लीसह भारतातील अनेक मोठी शहरे तसेच शारजा, दुबई आणि दोहा येथे विमाने जातात येतात. मल्टीमॉडेल पॅसेंजर व कार्यों हबसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्ल्डक्लास करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. परंतु, विमानतळ विस्तारीकरणाला येणारे अडथळे दूर करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. सध्यातरी २२ अडथळे दूर झाले असून १८३ अडथळे दूर करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत प्राप्त झाली आहे.
राज्य सरकार विमानतळाच्या जागेसह
एकूण २६०० एकर जमीन जीएमआर कंपनीला हस्तांतरित करणार असून विमानतळाचा विकास दोन टप्यात होणार आहे. विमानतळाच्या हस्तांतरणानंतर प्रवाशांच्या सोयी आणि सुलभतेत वाढ करण्यासाठी टर्मिनल आणि संबंधित सुविधांच्या नूतनीकरणाचे काम तात्काळ हाती घेतले जाईल. मिहान इंडियाला सर्वाधिक महसूल देण्याची तयारी
जीएमआरने दर्शवल्याने या प्रकल्पासाठी जीएमआरची निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यातील विकास कामांमध्ये सध्याच्या २२०० मीटर लांबीच्या धावपट्टीला समांतर ४ हजार मीटर लांब आणि ६० मीटर रुंद दुसरी धावपट्टी उभारण्यात येईल. आंतरराष्ट्रीयस्तराचे कार्गो टर्मिनल तसेच प्रवासी सुविधा राहतील. विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनलमध्ये प्रवाशांची वार्षिक क्षमता ४ कोटी गृहित धरण्यात आली आहे. नवीन टर्मिनल इमारत शिवणगाव येथे ७५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात येणार आहे. टॅक्सी-वे, अॅप्रोच रोड, पार्किंग आणि प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा यामध्ये उपलब्ध असतील. या सोबतच २० हजार मेट्रिक टन क्षमतेचे कार्गो
भारतातील २७ व्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ
२०२४-२५ या आर्थिक वर्षात या विमानतळाने सुमारे २.९ दशलक्ष प्रवाशांना सेवा दिली. ज्यामुळे ते भारतातील २७ व्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ बनले. या विमानतळावरून दररोज सुमारे ८ हजार प्रवाशांची सेवा मिळते आणि नागपूर ते शारजा, दोहा आणि १४ देशांतर्गत गंतव्यस्थानांना जोडणाऱ्या चार देशांतर्गत विमान कंपन्या आणिदोन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना सेवा पुरवली जाते. याविमानतळावर भारतीय हवाई दलाचे नागपूर हवाई दल स्टेशनदेखील आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथून ७०० किमी (३७८ मैल) पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या आणि येथून येणाऱ्या प्रवाशामुळे प्रवाशांच्या वाहतुकीत वाढ होते. विमानतळावर एक टर्मिनल आहे आणि दोन एरोब्रिज आहेत.
टर्मिनल उभारण्यात येणार असून विमानतळावर सद्यस्थितीत १७विमाने उभी राहू शकतात पुढील चार वर्षांत आणखी १६ प्रवासी व दोन कार्गो विमाने उभी राहू शकतील. लॉजिस्टिक्सला चालना देण्यासाठी २० हजार मेट्रिक टन कार्गो
टर्मिनल उभारण्यात येईल. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांसह नवीन प्रवेश रस्ते, एअरसाईड सुविधा, पार्किंग, हॉटेल्स आणि बरेच काही राहील. सुधारित ऑपरेशन्ससाठी नवीन एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) टॉवर उभारण्यात येईल.

0 9 4 6 9 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *