गुणवंत विद्यार्थी शताक्षी भुजबटकरचा सत्कार

KHOZ MASTER
1 Min Read

नागपूर : सेवानिवृत्त वरिष्ठ
पोलिस निरीक्षक गोपाळराव भुजबटकर यांची नात शताक्षी मनोज भुजबटकर हिने दहावीत ९२ टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार तुळशीराम ठाणेकर यांनी पुष्पगुच्छ व तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची मूर्ती देऊन सत्कार केला.
शताक्षी ही अशोकवन नागपूर येथील मोन्टफोर्ट शाळेची (सीबीएस्सी) विद्यार्थिनी आहे. कुठलेही क्लास न लावता अथक परिश्रम घेऊन तिने दहावीत ९२ टक्के गुण प्राप्त केले. भविष्यात डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न आहे. या सत्कारप्रसंगी शताक्षीचे वडील मनोज गोपाळराव भुजबटकर, मोरेश्वर घाडगे, तुषार ताकतोडे उपस्थित होते

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *