झोपडपट्टीतून घवघवीत यश – बेलतरोडी पोलिसांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Khozmaster
2 Min Read
Oplus_131072

झोपडपट्टीतून घवघवीत यश – बेलतरोडी पोलिसांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 

नागपूर | दि. १९ मे २०२५:

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली नगरसारख्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून १०वी व १२वीच्या परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या २० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.

ही उपक्रम पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, मा. रश्मिता राव यांच्या संकल्पनेतून व सहायक पोलीस आयुक्त अजनी विभाग, श्री. नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमात बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, गुन्हे शाखेच्या पोनि रूपाली बावणकर, सपोनि पंकज काकडे, स्नेहलता जायभाये, अच्युत रिडे, तसेच कर्मचारी राव आकरे, प्रशांत ठवकर, अजय नेवारे, नितीन भोंडे यांचे सहकार्य लाभले.

या सत्कार सोहळ्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारीपासून दूर राहून शिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी होण्याची प्रेरणा देणे हा होता. या विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या अभावातही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर घवघवीत यश मिळवले आहे.

 

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी (शे. टक्केवारीसह):

1. इशीका उतुल म्हैस्कर – 89%

2. भाग्यश्री मन्नु पटेल – 82%

3. स्वाती मनोहर बलबरे – 77.80%

4. तनुश्री राजु कालरकर – 75%

5. प्राप्ती निलेश तायडे – 70.80%

6. वैष्णवी जयलाल शाहु – 66.40%

7. विनय भादुलाल लील्हारे – 67%

8. महेक देवेद्र लांजेवार – 68%

9. गौरी जितेंद्र पटले – 61.40%

10. अनीता नारद वर्मा – 61%

11. राजेश्री राजु कालरकर – 57.60%

12. मीनाक्षी रमेश डेकाटे – 54%

13. नीरज नेत्राम पटेल – 53%

14. स्नेहा शंकर ठाकरे – 46%

15. अर्चना ढेलुचेतन यादव – 50%

16. वैभव इंद्रकुमार डोंगरे – 44.20%

17. श्रद्धा भुणेश वर्मा – 44%

18. काचन प्रेम भुल – 40%

19. आयुशी राजेंद्र राजुरकर – 53%

20. तनीशा भादुलाल लील्हारे – 45.60%

एकूण गुणवंत विद्यार्थी: २०

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाचे नागपूर शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. समाजातील अशा सकारात्मक बदलांना चालना देणाऱ्या पोलीस दलाचे अभिनंदन.

0 9 4 6 9 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *