नागपूरच्या प्रदूषणाचा त्रास ट्रॅफिक पोलिसांना :
NMC च्या स्टार बस आणि ऑटो रिक्षा प्रदूषणाचे मुख्य कारण
सीताबर्डी, झीरो माईल, धरमपेठसह १५ पेक्षा अधिक चौकांमध्ये आरोग्य धोक्यात, वैद्यकीय चाचण्या आणि उपाययोजना तातडीच्या गरजेच्या”
नागपूर, २० मे – वाढत्या वायुप्रदूषणाचा थेट परिणाम नागपूर विभागातील ट्रॅफिक पोलिसांच्या आरोग्यावर होत असून, शहरातील प्रमुख चौकांमध्ये ड्युटी बजावणारे पोलिस श्वसनाचे त्रास, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ आणि दम्याच्या लक्षणांनी त्रस्त आहेत. नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभाग यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस वैद्यकीय तपासणी योजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही.
प्रदूषणाने ग्रस्त ठिकाणे:सीताबर्डी चौक,झीरो माईल चौक,धरमपेठ चौक,मानकापूर चौक,लोहापुल चौक,इमामवाडा चौक,कस्तूरचंद पार्क चौक,पारडी नाका,काटोल रोड चौक,भांडेवाडी रोड,मोमिनपुरा चौक,गिट्टीखदान चौक हे आहे.
या सर्व ठिकाणी दिवसेंदिवस ट्रॅफिकचा ताण वाढत असून प्रदूषणाचे प्रमाण मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत ट्रॅफिक पोलिसांची तब्येत बिघडत आहे.
ट्रॅफिक पोलिसांसाठी आव्यकशक उपयोजना
दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी बंधनकारक करावी.
प्रत्येक ट्रॅफिक चौकीवर प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात.
एन-95 मास्क, प्रोटेक्टिव्ह गॉगल्स आणि अँटी-पॉल्युशन हेल्मेट्स द्यावेत.
प्रदूषणाच्या प्रमाणानुसार धोरणात्मक पातळीवर वृक्षारोपण वाढवावं.
प्रदूषणाचे मुख्य स्रोत:
नागपूर महानगरपालिकेच्या ‘स्टार बस’ सेवा – अनेक बसेस अत्यंत जुन्या असून, त्यांचे इंजिन नियमित मेंटेन नसल्याने अधिक धूर सोडतात.
ऑटो रिक्षा – अनेक ऑटो रिक्षांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसून, यांची तपासणी नियमित केली जात नाही.
जुनी डिझेल वाहने, ट्रक, आणि डिलिव्हरी व्हॅन्स – विशेषतः भांडेवाडी व कामठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दिसतात.
ट्रॅफिक पोलीस हे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे काम करतात. त्यांचे काम फक्त वाहनांना नियंत्रित करणेच नसून, अपघात टाळणे, वाहतूक सुरळीत राखणे, कायदा पाळवणे, तसेच विविध आपत्कालीन प्रसंगी मदत करणे हेही त्यांच्या जबाबदाऱ्या असतात.
ते दिवसरात्र, ऊन-पावसात, धूळधक्कडीत उभे राहून आपले काम करत असतात. सार्वजनिक सुट्ट्या, सणवार हे त्यांच्या दिनक्रमाचा भागच नसतो – कारण त्यावेळीच शहरात वाहतुकीचा अधिक ताण असतो. त्यांचं कुटुंब, खासगी आयुष्य या सर्व गोष्टींचा त्याग करून ते आपल्या कर्तव्यावर तितक्याच निष्ठेने काम करत राहतात.
मात्र, तरीसुद्धा त्यांच्या कामाच्या परिस्थितीविषयी, आवश्यक सुरक्षा साधनांची कमतरता, ताण-तणाव याबाबत प्रशासन पुरेसे लक्ष देताना दिसत नाही. त्यांच्या आरोग्याची, मानसिक स्थितीची आणि मूलभूत गरजांची ही फारशी दखल घेतली जात नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
Users Today : 47