वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनतर्फे वाहतूक उपायुक्त अर्चित चांडक यांचे स्वागत

Khozmaster
1 Min Read

वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनतर्फे वाहतूक उपायुक्त अर्चित चांडक यांचे स्वागत

नागपूर: शहरातील अनधिकृत वाहतूक व पार्किंगच्या समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असतानाच, नागपूरमध्ये वाहतूक कोंडी आणि जड वाहनांच्या बिनधास्त पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रशासकीय अधिकारी, खाजगी वाहन चालक-मालक, कुरिअर सेवा प्रतिनिधी, पत्रकार आणि सृजन नागरिक सहभागी झाले होते.

बैठकीत नागरिकांनी अनधिकृत पार्किंगमुळे होणाऱ्या त्रासाबाबत आवाज उठवला. विशेषतः रहदारीच्या भागांमध्ये ट्रॅव्हल्स आणि जड वाहने पार्क केल्यामुळे अपघाताची शक्यता वाढते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. या समस्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन वाहतूक उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिले.

याप्रसंगी वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनच्यावतीने अर्चित चांडक यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष संतोष चांदेकर, अनंता पुरी, अंकीत धुपे, निलेश डुंभरे, मोहम्मद शरीफ शेख, ॲड. अनुराधा गवई, ॲड. पंनमललम गवई, सल्लागार संजय उपरे व माजी उमेदवार देवेंद्रभाऊ कोळेकर उपस्थित होते.

नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाच्या प्रयत्नांनी लवकरच सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे

0 9 4 6 9 4
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *