नागपूरच्या मिनीमाता नगरमध्ये नवीन नागरी सामुदायिक आरोग्य केंद्रासाठी पाहणी; लवकरच सुरु होणार सेवा
नागपूर महानगरपालिका (NMC) तर्फे मिनीमाता नगर येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन नागरी सामुदायिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी, 22 मे रोजी केली.

या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त श्री. विजय थूल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, उपअभियंता श्री. राजीव गौतम, श्री. देवचंद काकडे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, शहर लेखा व्यवस्थापक श्री. नीलेश बाभरे, शाखा अभियंता श्री. जगदीश बावनकुळे आणि कंत्राटदार श्री. संजय मेडपल्लीवार यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य सेवा लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मनपाचे हे नवे रुग्णालय लवकरात लवकर सुरु होण्यासाठी सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश डॉ. चौधरी यांनी यावेळी दिले.

