पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तिसऱ्या जन्मशताब्दी निमित्त नागपूर महानगरपालिकेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

KHOZ MASTER
1 Min Read
Oplus_131072

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तिसऱ्या जन्मशताब्दी निमित्त नागपूर महानगरपालिकेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

नागपूर, दि. ३० मे:

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तिसऱ्या जन्मशताब्दीनिमित्त अनुसूचित जाती मोर्चा, नागपूर महानगरतर्फे नागपूर महानगरपालिकेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते महिलांचा सत्कार मेहंदी लॉन, भोसले सभागृह येथे पार पडला.

कार्यक्रमात केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे माजी सदस्य सुभाष पारधी, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे, तसेच सतीश सिरसवान, सौ. अर्चना डेहनकर, सौ. अश्विनी जीचकर, रामभाऊ आंबुलकर, शंकर मेश्राम, अनंत जगनीत, मोहिनी रामटेके, महेंद प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मोहिनी रामटेके यांनी केले, तर सादरीकरण सतीश सिरसवान यांनी केले. या वेळी दयाशंकर तिवारी यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावर व्याख्यान दिले.

या कार्यक्रमात शेकडो महिला स्वच्छता कर्मचारी उपस्थित होत्या. त्यांना साडी,शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात विनोद अरजापूर, रोहन चंदेकर, शरद पारधी, दिलीप गोईकर, सुनिल तुर्कल, अजय करोसिया, संजय भगत, नितीन बकसरिया, राजेश नंदेश्वर, किशोर बीहाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

हा कार्यक्रम सामाजिक समतेचा संदेश देत, महिला कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करणारा ठरला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *