आशा वर्कर युनियनतर्फे सीटूच्या ५५ व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम

KHOZ MASTER
1 Min Read
Oplus_131072

आशा वर्कर युनियनतर्फे सीटूच्या ५५ व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम

नागपूर |

सी आय टी यू (CITU) नागपूर जिल्हा अंतर्गत कार्यरत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे आज संघटनेच्या मुख्य कार्यालयात सीटूच्या ५५ व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे यांच्या हस्ते झेंडावंदन करून झाली.

स्थापना दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शन सत्रात सीटूच्या स्थापनेची ऐतिहासिक गरज, कर्तव्यांची रूपरेषा आणि कामगार चळवळीतील योगदान यावर सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना त्यांच्या नेमणुकीची पार्श्वभूमी, कामाचे स्वरूप व आरोग्य क्षेत्रातील त्यांचे योगदान समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमात कामाच्या ठिकाणी घेण्याच्या काळजीविषयी तसेच सध्याच्या काळात वाढत चाललेल्या ऑनलाईन कामाच्या ताणाविषयीही चर्चा झाली. ऑनलाईन डेटाअपलोडसारख्या कामांसाठी स्वतंत्र डेटा ऑपरेटरची नियुक्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी युनियनने केली.

यासोबतच, आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांवर असलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेता, त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा व किमान वेतन मिळावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली.

या कार्यक्रमाला कॉ. प्रीती मेश्राम, लक्ष्मी कोत्तेजवार, माया कावळे, प्रमोद कावळे, प्रतिमा डोंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *