शिकण्यासाठीच नव्हे, तर शिकवण्यासाठी” – बहुजन विचार मंचच्या उपक्रमातून दोन शैक्षणिक केंद्रांचे भव्य उद्घाटन
नागपूर | ७ जुलै २०२५
समाजात शिक्षणाचे बीज रुजवण्यासाठी आणि वंचित घटकांना ज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘बहुजन विचार मंच’ने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या मंचाचे संयोजक श्री. नरेंद्र जिचकार यांच्या वाढदिवसानिमित्त, स्व. झुल्लाबाई मडावी (कुमरे) अध्ययन केंद्र आणि ‘पढ़े हम, पढ़ाएँ हम’ शिक्षण केंद्र या दोन प्रेरणादायी उपक्रमांचे उद्घाटन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
या दोन शैक्षणिक केंद्रांचे लोकार्पण मा. माजी मंत्री श्री. सुनीलबाबू केदार यांच्या हस्ते होणार असून, ही उद्घाटने केवळ संस्थांची नव्हे तर एका वैचारिक चळवळीची सुरुवात ठरणार आहेत. समाजाच्या जडणघडणीत शिक्षणाचे मोलाचे योगदान असते, आणि ही केंद्रे त्या दिशेने ठोस वाटचाल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
🕚 वेळ: सकाळी ११:०० वाजता
📍 स्थळ: गोंड सभा शाळा, सेंट जॉन्स स्कूलजवळ, पहलवान बाबा दर्गा शेजारी, गड्डीगोदाम, नागपूर
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक-युवती आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ज्ञानाच्या या प्रकाशयात्रेला साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे, अशी सादर आमंत्रण आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
